YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 62:5-12

स्तोत्रसंहिता 62:5-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे माझ्या जिवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा; कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे; अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला) मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत. जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.

स्तोत्रसंहिता 62:5-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे. तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही. माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे. अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे. खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत. दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका; देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे. हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.

स्तोत्रसंहिता 62:5-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे. खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही. माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत. माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला साधारण मानव श्वासमात्र आहेत; विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत; तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील; ते सर्व श्वासमात्र आहेत. पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका; जरी तुमची संपत्ती वाढत असेल, तरी तिच्यावर मन लावू नका. परमेश्वर एकदा बोलले आहेत, मी दोनदा हे ऐकले आहे: “सामर्थ्य याहवेहचेच आहे, आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;” आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ देता.”