स्तोत्रसंहिता 61:5-8
स्तोत्रसंहिता 61:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण, हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; तुझ्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तू मला दिले आहेस; तू राजाला दीर्घायू कर; त्याच्या आयुष्याची वर्षें कैक पिढ्यांच्या वर्षांइतकी होवोत. तो देवासमोर चिरकाल राहो; तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर; म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन.
स्तोत्रसंहिता 61:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
स्तोत्रसंहिता 61:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे आणि तुमच्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत. तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो. तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो. तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा. म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.