स्तोत्रसंहिता 6:4-9
स्तोत्रसंहिता 6:4-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार. कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो. शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत. अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
स्तोत्रसंहिता 6:4-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार; कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही; अधोलोकात तुझे उपकारस्मरण कोण करणार? मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे; माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे; परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील.