स्तोत्रसंहिता 57:8-11
स्तोत्रसंहिता 57:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे माझ्या जिवा, जागृत हो, हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन. हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन; कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 57 वाचास्तोत्रसंहिता 57:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन. हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो. हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 57 वाचा