स्तोत्रसंहिता 51:9-13
स्तोत्रसंहिता 51:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर; म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील.
स्तोत्रसंहिता 51:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक. देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल. तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर. तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
स्तोत्रसंहिता 51:9-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या पातकांपासून आपले मुख फिरवा आणि माझे सर्व अपराध पुसून टाका. परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा. मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका. तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या. तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन, म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील.