स्तोत्रसंहिता 51:7-9
स्तोत्रसंहिता 51:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील. माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 वाचास्तोत्रसंहिता 51:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 वाचा