स्तोत्रसंहिता 51:5-7
स्तोत्रसंहिता 51:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 वाचास्तोत्रसंहिता 51:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे. मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 51 वाचा