स्तोत्रसंहिता 51:13-17
स्तोत्रसंहिता 51:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील. हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन. प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल. कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही. देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
स्तोत्रसंहिता 51:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.