स्तोत्रसंहिता 48:1-3
स्तोत्रसंहिता 48:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते. देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
स्तोत्रसंहिता 48:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत. त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे. परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे.
स्तोत्रसंहिता 48:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.