स्तोत्रसंहिता 46:4-7
स्तोत्रसंहिता 46:4-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे. त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)
स्तोत्रसंहिता 46:4-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.
स्तोत्रसंहिता 46:4-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात. परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील. राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली; त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते. सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला