YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 43:1-5

स्तोत्रसंहिता 43:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड, कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस; तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू? तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत. तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत. तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन. हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? आतल्या आत तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव त्याची मी आणखी स्तुती करेन.

स्तोत्रसंहिता 43:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर. कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस; तू माझा का त्याग केलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे? तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत; म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन.