स्तोत्रसंहिता 34:4-8
स्तोत्रसंहिता 34:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला. जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत. या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले. परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो. परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
स्तोत्रसंहिता 34:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!