स्तोत्रसंहिता 33:6-9
स्तोत्रसंहिता 33:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत. तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो. सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो. कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 33 वाचास्तोत्रसंहिता 33:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 33 वाचा