स्तोत्रसंहिता 31:19-24
स्तोत्रसंहिता 31:19-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील. परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे. मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली. अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो. जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.
स्तोत्रसंहिता 31:19-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस. परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास. अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो. अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.