स्तोत्रसंहिता 31:14-16
स्तोत्रसंहिता 31:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचास्तोत्रसंहिता 31:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” माझे दिवस तुमच्याच हातात आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून, माझा पाठलाग करणार्यांपासून तुम्हीच मला सोडवा. तुमचा मुखप्रकाश तुमच्या दासावर पडू द्या; तुमच्या प्रेमदयेने माझे तारण करा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचास्तोत्रसंहिता 31:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.” माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणार्यांपासून मला सोडव. तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड; तू आपल्या वात्सल्याने मला तार.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचा