स्तोत्रसंहिता 3:5-8
स्तोत्रसंहिता 3:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत. तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
स्तोत्रसंहिता 3:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात. असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही. याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका. कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला
स्तोत्रसंहिता 3:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे. मी त्यांना भिणार नाही, हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत. तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)