स्तोत्रसंहिता 28:6-9
स्तोत्रसंहिता 28:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे. तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
स्तोत्रसंहिता 28:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे. याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन. याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत. तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.
स्तोत्रसंहिता 28:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.