स्तोत्रसंहिता 28:1-9
स्तोत्रसंहिता 28:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस; तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणार्यांसारखी माझी गती होईल. मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभार्याकडे हात वर करतो; तेव्हा माझी दीन वाणी ऐक. मनात कपट असून आपल्या शेजार्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस. त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे, त्यांचे पारिपत्य कर; त्यांचे प्रतिफळ त्यांना दे. परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती, ते ध्यानात आणीत नाहीत म्हणून तो त्यांना जमीनदोस्त करील, उभारणार नाही. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.
स्तोत्रसंहिता 28:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन. जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक. जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते. त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर. कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही. परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे. तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
स्तोत्रसंहिता 28:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन. मी पवित्रस्थानाकडे माझे हात उंच करतो; साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो; माझी दयेची आरोळी ऐका. दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते. जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा. कारण याहवेहच्या महान कृत्यांचे व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. याहवेहच त्यांचा नाश करतील. मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही. याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे. याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन. याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत. तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.