YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 27:3-6

स्तोत्रसंहिता 27:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन. मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन. कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील. तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन.

स्तोत्रसंहिता 27:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला, तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही; माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले, तरी मी निश्चिंत राहीन. मी याहवेहला एक याचना केली, हीच माझी आकांक्षा आहे: मी आयुष्यभर याहवेहच्या भवनात वस्ती करावी जेणेकरून मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या मंदिरात ध्यान करावे. कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील. माझ्या सभोवती असणार्‍या शत्रूंसमोर माझे मस्तक उंच करतील. मी त्यांच्या पवित्र मंडपात हर्षगर्जना करून यज्ञ अर्पण करेन; मी गायन व संगीताने माझ्या याहवेहची स्तुती करेन.

स्तोत्रसंहिता 27:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैर्‍यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्‍यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन.

स्तोत्रसंहिता 27:3-6

स्तोत्रसंहिता 27:3-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 27:3-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 27:3-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 27:3-6 MARVBSIस्तोत्रसंहिता 27:3-6 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा