स्तोत्रसंहिता 25:7-9
स्तोत्रसंहिता 25:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर. परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो. तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
स्तोत्रसंहिता 25:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात. याहवेह चांगले आणि न्यायी आहेत; म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात. ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.
स्तोत्रसंहिता 25:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.