स्तोत्रसंहिता 25:4-11
स्तोत्रसंहिता 25:4-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे.
स्तोत्रसंहिता 25:4-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव. तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो. हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर. हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर. परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो. तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो. जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत. परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत.