स्तोत्रसंहिता 19:12-14
स्तोत्रसंहिता 19:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचास्तोत्रसंहिता 19:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या स्वत:च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर. तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख; ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपूर्ण होईल, आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन. माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचा