स्तोत्रसंहिता 16:4-8
स्तोत्रसंहिता 16:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही. परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस. माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे. मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते. मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
स्तोत्रसंहिता 16:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.