स्तोत्रसंहिता 150:1-6
स्तोत्रसंहिता 150:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा. डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा. प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 150:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा. डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणार्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1