स्तोत्रसंहिता 149:2-5
स्तोत्रसंहिता 149:2-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो. भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
स्तोत्रसंहिता 149:2-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा. त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा. कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात. या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.
स्तोत्रसंहिता 149:2-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत. ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे; तो दीनांना तारणाने सुशोभित करतो. भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.