स्तोत्रसंहिता 13:2-5
स्तोत्रसंहिता 13:2-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
स्तोत्रसंहिता 13:2-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर; नाहीतर “मी ह्याला जिंकले” असे माझा वैरी म्हणेल; आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्लासतील. मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल.