स्तोत्रसंहिता 12:5-7
स्तोत्रसंहिता 12:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.” परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत. हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 12 वाचास्तोत्रसंहिता 12:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.” परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत. हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 12 वाचा