YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:89-176

स्तोत्रसंहिता 119:89-176 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे. तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे. मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो. अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन. तुझ्या नियमांपासून बहकणार्‍या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे. पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत. तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो. मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस. तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव. मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. तुझे निर्बंध आश्‍चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्‍यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव. लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत. माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत. तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत. अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते. मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. माझा जीव तुझे निर्बंध पाळतो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत. मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळतो; कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे. हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत. हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता 119:89-176 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे. तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते. त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात. जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता. मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे. मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन. प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत. अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो. तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो. वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे. मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे. तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत. तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे. मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव. हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव. माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे. परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते. मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे. वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन. तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत. पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो. तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते. मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको. तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत. तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव. मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे. ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे. खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते. मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली. तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस. तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको. मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव. माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत. तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे. मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे. मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन. मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन. मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे. तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव. जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे. मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव. तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे. अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते. ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो. मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे. मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो. तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते. हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत. मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे. हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर. तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत. हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे. माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो. मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता 119:89-176 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे; ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते. तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते; तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे. तुमचे नियम आजवर अस्तित्वात आहेत, कारण सर्वकाही तुमची सेवा करतात. जर तुमचे नियम माझ्या सुखाचा ठेवा झाले नसते, तर पीडेने माझा केव्हाच अंत झाला असता. मी तुमचे नियम कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्याद्वारे तुम्ही माझ्या जीवनाचे जतन केले आहे. मी तुमचा आहे, माझे तारण करा; कारण मी तुमच्या विधीचा शोधक आहे. दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत, तरी मी माझे चित्त तुमच्या अधिनियमाकडे लावेन. प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते, परंतु तुमच्या आज्ञा निस्सीम आहेत. अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो. तुमची वचने सतत माझ्यासह असतात, आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात. मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो. मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो. दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन. मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे. किती मधुर आहेत तुमची वचने, माझ्या मुखात ती मला मधापेक्षाही गोड लागतात! तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो. तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे. मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन. याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझे जतन करा. याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा. जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही. दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही. तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत, माझ्या अंतःकरणाचा उल्हास आहेत. शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे. दुटप्पी लोकांचा मला तिरस्कार वाटतो, पण मला तुमचे नियम प्रिय आहेत. तुम्ही माझा आश्रय व माझी ढाल आहात; तुमच्या अभिवचनांवर मी आशा ठेवली आहे. अहो कुकर्मी लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा, जेणेकरून माझ्या परमेश्वराच्या आज्ञांचे मी पालन करेन. हे परमेश्वरा, तुमच्या अभिवचनानुसार माझे जतन करा, म्हणजे मी जिवंत राहीन; माझी आशाभंग होऊ देऊ नका. मला उचलून धरा म्हणजे माझी सुटका होईल; मी तुमच्या नियमांचा नेहमी आदर करतो. जे तुमच्या नियमापासून पथभ्रष्ट होतात, त्यांना तुम्ही नाकारले आहे, त्यांचा संभ्रम निरर्थक ठरू द्या. पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तुम्ही एखाद्या गाळाप्रमाणे टाकून देता; म्हणूनच तुमचे नियम मला प्रिय आहेत. तुमच्या भीतीने माझा देह थरथर कापतो; मला तुमच्या विधिनियमाचा दरारा वाटतो. मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोपवू नका. आपल्या सेवकाचे कल्याण सुनिश्चित करा; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नका. माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता माझे डोळे अंधुक झाले आहेत. आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा आणि मला तुमचे नियम शिकवा. मी तुमचा दास आहे; मला विवेकबुद्धी द्या, म्हणजे तुमचे नियम समजतील. हे याहवेह, तुम्ही कृती करण्याची वेळ आली आहे; तुमच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कारण मी तुमच्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावन्नकशी सोन्यापेक्षाही अधिक प्रिय मानतो, कारण तुमचा प्रत्येक नियम यथायोग्य मानतो; म्हणून सर्व असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. तुमचे नियम अद्भुत आहेत; म्हणून मी त्यांचे पालन करतो. तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते. माझे मुख उघडून मी धापा टाकल्या, कारण तुमच्या आदेशाची मला आस लागली होती. मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा, जशी तुमच्या नामावर प्रीती करणार्‍यांवर तुम्ही नेहमी करता, तशी करा. तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा, म्हणजे पाप मजवर सत्ता गाजविणार नाही. मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील. तुमच्या सेवकावर आपला मुखप्रकाश पडू द्या, आणि तुमचे सर्व नियम मला शिकवा. माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात, आणि तुमचे नियमही अचूक आहेत. तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत. माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात. तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत. मी स्वतः महत्त्वहीन व तिरस्कृत असलो, तरी तुमचे नियम मी विसरत नाही. तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे, आणि तुमचे नियम सत्य आहेत. संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे, परंतु तुमच्या आज्ञा मला सुखावतात. तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन. हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या, म्हणजे मी तुमच्या नियमांचे पालन करेन. मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा म्हणजे मी तुमच्या आज्ञा पाळू शकेन. सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे. मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो, म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन. तुमच्या वात्सल्य-कृपेनुसार माझी प्रार्थना ऐका; याहवेह, तुमच्या वचनानुरुप माझे जतन करा. माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे निकट आले आहेत, पण ते तुमच्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. परंतु हे याहवेह, तुम्ही माझ्याजवळ आहात, व तुमच्या सर्व आज्ञा सत्य आहेत. अनेक वर्षापूर्वी तुमच्या अधिनियमांबद्दल मी हे शिकलो आहे की, ते तुम्ही सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. माझ्या दुःखाकडे पाहा आणि मला त्यातून सोडवा, कारण मी तुमच्या आज्ञा विसरलो नाही. माझ्या वादाचे समर्थन करा आणि माझी सुटका करा; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या जीवनाचे जतन करा. दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत. हे याहवेह, तुमची दया किती महान आहे; तुमच्या नियमानुसार माझे जतन करा. मला छळणारे कितीतरी शत्रू आहेत, पण मी तुमचा आज्ञाभंग केला नाही. मला या विश्वासघातक्यांचा वीट आला आहे, कारण ते तुमच्या वचनाचे पालन करीत नाहीत. याहवेह पाहा, मी तुमच्या आज्ञांवर किती मनापासून प्रीती करतो; तुमच्या वात्सल्यानुरूप माझी जोपासना करा. तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत. अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला, परंतु माझे हृदय केवळ तुमच्याच वचनांनी कंपित होते. मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो, तसा मला तुमच्या अभिवचनांनी आनंद होतो. असत्याचा मी द्वेष व घृणा करतो, पण तुमच्या नियमांवर मी प्रीती करतो. तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल दिवसातून सात वेळा मी तुमचे स्तवन करतो. जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत. याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो, आणि मी तुमच्या आज्ञा पाळतो. मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो, कारण त्या मला अतिशय प्रिय आहेत. मी तुमचे उपदेश व नियम पाळतो, कारण माझा प्रत्येक मार्ग तुम्हाला माहीत आहे. हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो; आपल्या वचनाप्रमाणे मला विवेकवंत करा. माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो; तुम्ही आपल्या अभिवचनाप्रमाणे माझी सुटका करा. माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो, कारण तुम्ही मला तुमचे विधी शिकविले आहेत. माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ, कारण तुमचे सर्व नियम नीतियुक्त आहेत. मला साहाय्य करण्यास तुमची भुजा सतत तयार राहो, कारण मी तुमच्या अधिनियमांचा स्वीकार केला आहे. हे याहवेह, मी तुमच्या तारणाची उत्कंठा धरलेली आहे; तुमचे नियम माझा अत्यानंद देतात. मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत. हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही.