स्तोत्रसंहिता 119:81-83
स्तोत्रसंहिता 119:81-83 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील? कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:81-83 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो. तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?” जरी मी धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा झालो आहे; तरी मी तुमचे नियम कधीही विसरत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:81-83 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो. तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे. धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा