YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:25-32

स्तोत्रसंहिता 119:25-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव. मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे. माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव. मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस. मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.

स्तोत्रसंहिता 119:25-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

माझा जीव धुळीस मिळाला आहे; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिलेस; तू आपले नियम मला शिकव. तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. मी सत्याचा मार्ग निवडला आहे; मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस. तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो.