स्तोत्रसंहिता 119:169-173
स्तोत्रसंहिता 119:169-173 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर. तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:169-173 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा