स्तोत्रसंहिता 118:8-13
स्तोत्रसंहिता 118:8-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन. त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
स्तोत्रसंहिता 118:8-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे; खरोखर मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला मधमाश्यांप्रमाणे घेरले आहे; काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले.