स्तोत्रसंहिता 106:7-8
स्तोत्रसंहिता 106:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली. तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 106 वाचास्तोत्रसंहिता 106:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 106 वाचा