YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:7-21

स्तोत्रसंहिता 106:7-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली. तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे. त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले. त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले. परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. त्यापैकी एकही जण वाचला नाही. नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली. परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही. रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, आणि त्यांनी देवाला आव्हान दिले. त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला. त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले. जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले. त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले. त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली. त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली. ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.

स्तोत्रसंहिता 106:7-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा ते इजिप्तमध्ये होते, तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही; तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले; उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले. तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले. तांबड्या समुद्राला दरडावताच तो कोरडा झाला; वाळवंटातून चालत असल्यासारखे त्यांना खोल समुद्रातून चालविले. त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले; शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली. त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळाली; त्यापैकी एकजणही वाचला नाही. तेव्हा लोकांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला, व त्यांचे स्तुतिगान केले. परंतु त्यांनी केलेले कार्य ते लवकर विसरले, त्यांनी केलेली योजना पूर्ण होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही. ओसाड भूमीत त्यांनी आपल्या उत्कट इच्छांना मोकळी वाट करून दिली; वाळवंटात परमेश्वराची परीक्षा पाहिली. परमेश्वराने त्यांच्या मागण्या पुरविल्या, परंतु जीव झुरणीस लावणारा रोगही त्यांच्याकडे पाठविला. तंबूत असताना मोशे आणि याहवेहचा अभिषिक्त अहरोन यांच्या विरुद्धही त्यांचा हेवा वाढला. मग पृथ्वी उघडली आणि तिने दाथानाला गिळून टाकले; अबीराम व त्याच्या समुहाला दफन केले. आणि त्यांच्या अनुयायांवर अग्निपात झाला; दुष्ट माणसांना भस्म करण्यात आले. होरेब येथे त्यांनी एका वासराची मूर्ती घडविली, आणि त्या धातूच्या मूर्तीची आराधना केली. परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल गवत खाणार्‍या बैलाच्या प्रतिमेशी केली. त्या परमेश्वराला ते विसरले, ज्यांनी त्यांना सोडविले, इजिप्त देशात महान चमत्कार केले

स्तोत्रसंहिता 106:7-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांना चालवले. त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्‍याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले. त्यांचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातला कोणीही उरला नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला; त्यांनी त्याची स्तोत्रे गाइली. तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन ह्यांचा हेवा केला. तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले; त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले. त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली. त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणार्‍या बैलाची प्रतिमा स्वीकारली. ते आपल्या उद्धारक देवाला विसरले; त्याने मिसर देशात महत्कृत्ये