स्तोत्रसंहिता 105:16-19
स्तोत्रसंहिता 105:16-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले.
स्तोत्रसंहिता 105:16-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी त्यांच्या देशावर दुष्काळ आणला, आणि त्यांचा अन्नपुरवठा तोडून टाकला. तेव्हा त्यांनी एका पुरुषाला— योसेफाला पाठविले. इजिप्तींनी योसेफाच्या पायांना खोडे घालून इजा केली, त्याची मान लोखंडी गळपट्ट्यात अडकविली. याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत, त्यांनी दिलेले अभिवचन पूर्णपणे पारखले जाईपर्यंत हे घडले.
स्तोत्रसंहिता 105:16-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला; त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले.