स्तोत्रसंहिता 10:16-18
स्तोत्रसंहिता 10:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर युगानुयुग राजा आहे; त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत. हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस; त्यांचे मन तू स्थिर करतोस; पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.
स्तोत्रसंहिता 10:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत. हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
स्तोत्रसंहिता 10:16-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत; त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत. याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा. गांजलेले व अनाथांचे रक्षण करा, म्हणजे मर्त्य मानवाची त्यांना पुन्हा कधीही दहशत वाटणार नाही.