नीतिसूत्रे 8:1-4
नीतिसूत्रे 8:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते; ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, “मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे.
नीतिसूत्रे 8:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का? रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, ज्ञान तिला चौकाकडे उभे करते. ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते. “लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते.
नीतिसूत्रे 8:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का? रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते; शहरात जाणार्या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते: “अहो लोकांनो, मी तुम्हाला बोलाविते; सर्व मानवजातीला उद्देशून मी माझा आवाज उंचाविते.