नीतिसूत्रे 6:6-11
नीतिसूत्रे 6:6-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही. तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते. अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
नीतिसूत्रे 6:6-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो; तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.