नीतिसूत्रे 6:23-26
नीतिसूत्रे 6:23-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे; दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून, ती तुझे रक्षण करणारी आहेत. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस. कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करते.
नीतिसूत्रे 6:23-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे. ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते. तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो. वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.
नीतिसूत्रे 6:23-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत. ते तुला तुझ्या शेजार्याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात. तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस. कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, परंतु दुसर्या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.