YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 5:3-10

नीतिसूत्रे 5:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात; म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस; गेलास तर तुझी अब्रू दुसर्‍यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्‍याच्या घरात जाईल

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचा

नीतिसूत्रे 5:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही. आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका. तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको. गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील; तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचा