नीतिसूत्रे 5:15-20
नीतिसूत्रे 5:15-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां? ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा. कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा. माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
नीतिसूत्रे 5:15-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय? ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्यांना त्यांचा उपयोग न घडो. तुझ्या झर्याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?