YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 24:1-22

नीतिसूत्रे 24:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दुर्जनांचा हेवा करू नकोस, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस. त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते; ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. सुज्ञ पुरुष बलवान असतो; ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो. शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालव; बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते. ज्ञान मूर्खाच्या आटोक्याबाहेर असते; वेशीवर तो आपले तोंड उघडीत नाही. जो दुष्कर्म करण्याचे योजतो, त्याला लोक घातकी माणूस म्हणतात. मूर्खाचा विचार पापरूप असतो; निंदकाचा लोकांना वीट येतो. संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. “आम्हांला हे ठाऊक नव्हते” असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणार्‍याला हे कळत नाही काय? तुझा जीव राखणार्‍याला माहीत नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? माझ्या मुला, मध खा, तो चांगला आहे, मधाचे पोळे खा; ते तुझ्या जिभेला गोड लागते; असेच ज्ञान तुझ्या जिवाला आहे असे समज; ते तुला प्राप्त झाले तर फलप्राप्ती घडेल; तुझी आशा खुंटणार नाही. अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस; कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये; उल्लासले तर ते परमेश्वर पाहील आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवील. दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; दुर्जनांचा मत्सर करू नकोस. कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही; दुर्जनांचा दीप मालवेल. माझ्या मुला, परमेश्वराचे व राजाचे भय बाळग. जे चंचल वृत्तीचे आहेत त्यांच्यात मिसळू नकोस; कारण त्यांच्यावर विपत्ती अचानक येईल, आणि त्यांच्या आयुष्याचा क्षय केव्हा होईल कोण जाणे?

सामायिक करा
नीतिसूत्रे 24 वाचा

नीतिसूत्रे 24:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस. कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात. शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे. कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो; आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो. मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो. जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात. मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो. जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे. ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर. जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां? माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे. त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही. अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको! कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल. तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको. उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल. जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको. कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल. माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस. कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?

सामायिक करा
नीतिसूत्रे 24 वाचा

नीतिसूत्रे 24:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दुर्जनांचा मत्सर करू नका, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नका; कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात. सुज्ञानाद्वारे घर बांधले जाते, आणि समंजसपणामुळे ते स्थिर राहते; ज्ञानाद्वारे त्याच्या खोल्या दुर्मिळ आणि सुंदर अशा मौल्यवान वस्तूंनी भरलेल्या असतात. सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात. लढाईवर जाण्यासाठी निश्चितच तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते, कारण अनेक सल्लागारांद्वारे विजय प्राप्त होते. सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते; वेशीतील सभेत त्यांनी आपले तोंड उघडू नये. जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील. मूर्खाच्या योजना म्हणजे पाप, आणि लोक टवाळखोर मनुष्याचा द्वेष करतात. जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे! ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; जे लटपटणार्‍या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव. जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का? माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे; आणि पोळ्यातून पाझरणारे मध तुझ्या जिभेला गोड लागेल. त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही. चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको; कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात. जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये, नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील. वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका, कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल. माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्‍यांना सहभागी होऊ नकोस, कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे?