नीतिसूत्रे 22:3-7
नीतिसूत्रे 22:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. कुटिल मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात; ज्याला जिवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो.
नीतिसूत्रे 22:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते. कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो. मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही. श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.