YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 2:5-12

नीतिसूत्रे 2:5-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात; सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्‍यांना तो ढाल आहे; अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 वाचा

नीतिसूत्रे 2:5-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात. जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे, तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील. मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल. ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील. दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल. ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 वाचा