नीतिसूत्रे 2:1-7
नीतिसूत्रे 2:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील, ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील. जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील; जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील; तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात. जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे
नीतिसूत्रे 2:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात; सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्यांना तो ढाल आहे