नीतिसूत्रे 2:1-6
नीतिसूत्रे 2:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील, ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील. जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील; जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील; तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
नीतिसूत्रे 2:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील, सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील, तुझे मन समंजसपणाकडे लावशील— मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील, आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील, तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण याहवेह सुज्ञान देतात; त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.
नीतिसूत्रे 2:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात