नीतिसूत्रे 16:1-3
नीतिसूत्रे 16:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 16 वाचानीतिसूत्रे 16:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 16 वाचानीतिसूत्रे 16:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 16 वाचा