नीतिसूत्रे 12:17-22
नीतिसूत्रे 12:17-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो. कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल, पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे. वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. नीतिमानावर संकटे येत नाहीत, परंतु दुर्जनावर अडचणी येतात. खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
नीतिसूत्रे 12:17-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो. कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. वाईट योजणार्यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्यांच्या मनात हर्ष असतो. नीतिमानाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्टांनी व्याप्त होतील. असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात.