नीतिसूत्रे 1:29-33
नीतिसूत्रे 1:29-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील. कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”
नीतिसूत्रे 1:29-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही; त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला; म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील; कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते; पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”