YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 1:10-19

नीतिसूत्रे 1:10-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, आणि ते रक्त पाडायला घाई करतात. एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचा

नीतिसूत्रे 1:10-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस. ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू; त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्‍यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू. आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू; तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;” तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस. कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात. एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणार्‍या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचा